झिरो बजेट नैसर्गिक/ आध्यात्मिक शेती

संकल्पना व मार्गदर्शन :- कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर

 


अन्न्द्रव्ये

नत्राणू  नायट्रेटस

     नत्राणू दोन प्रकारचे आहेत

                   1) सहजीवी नत्राणू (सीमबीयॉटीक)

                   2) असहजीवी नत्राणू (नॉन सीमबीयॉटीक)

सहजीवी नत्राणू:   रायझोबीयम द्विदल मुळयांच्या गाठीत बुरशी लेग्युमीनीसी परीवार

असहजीवी नत्राणू : एझोटो एक दल पिकांच्या मुळी जवळ असतात.

               भात, गहू ,ज्वारी, बाजरी, मक्का, नाचनी, व तेल वर्गीय पिके.

     त्याकरिता नेहमी मल्टीलेअर शेती करावी म्हणजे मुख्यपीक  एक दल किंवा तेल वर्गीय असेल तर त्यामध्ये द्विदल हे अंतरपीक  घेतले पाहिजे. 

फॉसफेट : (स्फुरद)

     1) एक कण स्फुरद (मोनोव्यालेंट कॅलशीअम फोसफेट)

     2) द्विकण स्फुरद (डायव्यालेंट कॅलशीअम फोसफेट)

     3) त्रिकण स्फुरद (ट्रायव्यालेंट कॅलशीअम फोसफेट)

     प्रत्येक पिकाला एक कण स्फुरद पाहिजे. स्फुरादाचे विघटन करणारे जीवाणू

     ( स्फुरदाणू ) करतात.

 

 पोटॅशिअम: (पोटॅश पलाश)

     पोटॅश हा बहुकणा मध्ये असतो. पण पिकाला  एक कणा  पोटॅश लागतो. हा एक      कण विघटनातून मिळतो.

          पोटॅश विघटक  बॅसीकस सीलीकस 

          थायोऑक्सीडंट गंधक देतो

          मथकोरायजा बुरशी अन्नपुर्णा जीवाणू  

     ऑक्टोबर-नव्हेंबर महिन्यात किंवा मार्च, एप्रील, मे व जुन मध्ये हवेचे         तापमान वेगाने वाढतात करण सुर्यप्रकाशाची तीव्रता  7000 फुट कँडल           ते 12000 फुट कँडल एवढी  असते. या उच्चतापमान पातळीला वाढलेली     असते.     या आधिक तापमानामुळे पानांचे तापमान वाढते व पानांतील पाणी       बाष्पीभवन हवेत निघून  जाते. पानांमध्ये पाण्याची कमतरता होते व              त्यावेळेस पान मुळयांना संदेश  पाठवतात व अशावेळेस मुळी जमिनीतून        पाणी उचलते व पानांना देते. अशा तऱ्हेने बाष्पीभवनाचा वेग वाढतो व         जमिनीतला ओलावा झपाटयाने कमी  होते व शेवटी जमिनीतील पाणी               राहत नाही  व पाने  सुकायला लागतात. पानांच्या मागच्या बाजूला       अनंत      सुक्ष्मछिद्र असतात त्यांना (स्टोमॅटो) पर्णछिद्र म्हणतात. ही  पर्णछिद्र     सर्व      बाजुंनी सुक्ष्म पेशींनी वेढलेल्या असतात. या पेशी पाहिजे तेव्हा या पर्ण        छिद्रांची उघड झाप करतात. त्यामुळे पानांच्या हालचाली नियंत्रीत होतात.        या पर्णछिद्रांतुनच सुर्यप्रकाश घेतात व कर्बआम्ल(सी ओ टू व प्राण वायु बाहेर   पडते व पाण्याची वाफ सुद्धा निघते. प्रत्येक पिकांच्या पानांची सुर्यप्रकाशाची   तीव्रता  सहन करण्याची शक्ती वेगवेगळी असते. डाळिंब व द्राक्षांच्या पानांना   5400 ते 6000 फुट कँडल सुर्यप्रकाशाची त्रिवता सहन होते आणी जास्त     उष्णतामान असेल तेव्हा      पानांतून  होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी सुरक्षापेशी पर्णछिद्र बंद करतात. परंतु रासायनिक शेतीमध्ये व सेंद्रीय शेतीमध्येसुधा       पेशींना कामावर लावणारे संजीवकं पानात निर्माण होत नाहीत व त्यामुळे पर्ण   छिद्रांची उघड झाप होत नाही व पीक  धोक्यात येते. जीवामृतांमध्ये ही         संजीवक असल्यामुळे सुरक्षा पेशी जास्त उष्णतामान असेल तर छिद्र बंद         करतात. त्यामुळे पानांतून  होणारे बाष्पीभवन थांबवते व पिकांचे नुकसान         होत नाही

5)   सुर्यप्रकाश जेव्हा पानांवर पडतो तेव्हा सुर्यप्रकाशा सोबत पानांचे नुकसान        करणारे काही  विकीरण(अल्ट्रावॉयलेट रेज्) पानावर पडतात त्यामुळे             पानामध्ये होणाऱ्या सगळया जैविक, जैवरासानिक व रासायनिक क्रिया         अनियंत्रीत होतात व पिकांचे नुकसान होते. जीवामृताच्या फवारणीमुळे        हे नुकसान  टाळता येते      

                   भात, गहू ,ज्वारी, बाजरी, मक्का, नाचनी, व तेल वर्गीय पिके.

     त्याकरिता नेहमी मल्टीलेअर शेती करावी म्हणजे मुख्यपिक एक दल किंवा तेल वर्गीय असेल तर त्यामध्ये द्विदल हे अंतरपिक घेतले पाहिजे.