संकल्पना व मार्गदर्शन :-
कृषी-ऋषी पद्मश्री श्री सुभाष पाळेकर

आच्छादनाचे प्रकार


आच्छादनाचे प्रकार :
            

1)मृदाच्छादन (मातीचे आच्छादन सॉइल मल्चींग) म्हणजे जमिनीची मशागत
2)काष्ठाच्छादन (स्ट्रॉ मल्चींग काडी, कचरा)
3)सजीव आच्छादन ( लार्इव मल्चींग) अंतरपिके
1) मृदाच्छादन :
जमिनीला सतत भेगा पडत असतात व त्याभेगातून  जमिनीतील ओलावा निघून  जात असतो. जसजसे उष्णतामान वाढतो तसतसे ओलावा उडण्याचा वेग वाढतो त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा राहत नाही . त्यामुळे जमिनीमध्ये काम करणाऱ्या जीवजंतुंना व मुळयांना ओलावा मिळत नाही  परिणामी जीवजंतु मरतात व ह्युमसची निर्मीती थांबते व त्या भेगांतून  कार्बन सुद्धा वेगाने उडून  जातो ह्याल कार्बन ऑक्सीडेशन म्हणतात. त्यामुळे जमिन वाळवंट बनते. आपल्या जमिनीमध्ये 2.5% कार्बन पाहिजे तरच आपली जमीन  पैलवान बनते.
त्यासाठी जमिनीतून  कार्बन उडून जाणे थांबवले पाहिजे व जमिनीमध्ये ओलावा टिकून  ठेवला पाहिजे. ह्यासाठी कोरडवाहू शेतीमध्ये मशागत केली जाते.
मशागतीचे ऊद्देश
1) जमिनीमध्ये हवा खेळती ठेवणे
2) पावसाचे पाणी संग्रहीत करणे
3) तणांचे  नियंत्रन करणे
जमिनीतील मुळयांना व जीवजंतुंना हवा पाहिजे म्हणुन हवा खेळती ठेवायची त्यासाठी पावसाचे पाणी साठवणे, त्यासाठी मशागत म्हणुन प्राचीन काळापासुन लाकडी नांगराने, वखराने व कोळप्याने जमिनीची मशागत केली जाते व ती संपुर्ण शास्त्रीय आहे. मात्र कृषीविदयापिठांच्या शिफारसीनुसार ट्रॅक्टर ने केलेली खोल मशागत चुकीची व अशास्त्रीय आहे.
 सजीव आच्छादन लार्इव मल्चींग 
सजीव आच्छादन म्हणजे आंतरपिके व मिश्र पिके.
आंतरपिकं कशी आसावी.
1) मुख्य पिक एक दल असेल तर अंतरपिक द्विदल असले पाहिजे आणी मुख्य पिकं द्विदल असेल तर अंतरपिकं एकदल असली पाहिजेत .
2) आंतर पिकांची उंची मुख्यपिकाच्या उंचीच्या 1/3 किंवा निम्मे असले पाहिजे. म्हणजे दोन्ही पिकांची पान सक्षमपणे  सुर्यप्रकाश घेऊ शकतात व त्यांच्यामध्ये स्पर्धा होत नाही॰
3) मुख्य पिकांच्या खोल मुळया असतील तर अंतरपिकाच्या मुळया उथळ असल्या पाहिजेत . तसेच मुख्यपिकांच्या  मुळया उथळ असतील तर आंतरपिकाच्या मुळया खोल असल्या पाहिजेत .
4) आंतरपिकांचे आयुष्य मुख्य पिकाच्या आयुष्याच्या 1/3 किंवा निम्मा असला पाहिजे.
5) शक्यअसेल तर आंतरपिके वेगाने वाढणारी व वेगाने जमिन झाकून  टाकणारी असावि.
6) आंतरपिकांमध्ये शेंगावर्गीय, तेल वर्गीय, पाले-भज्या वर्गीय व फुलवर्गीय आंतरपिकाचा  समावेश असावा.
7) मुख्य पिकांमध्ये किंवा फळ बागामध्ये अशा सहजीवी  अंतरपिकाचं  नियोजन केलं  पाहिजे जेणेकरून आंतरपिकाची लावणी झाल्यानंतर वर्षभर प्रत्येक महिन्यात सतत त्या आंतरपिकांपासुन उत्पन्न मिळून आपल्या  आर्थिक गरजा भागल्या पाहिजेत
8) अंतरपिकांची पाण्याची गरज मुख्यपिकाच्या गरजेपेक्षा कमि असली पाहिजे.
9) मुख्य पिकावर येणाऱ्या या हाणीकारक किडींना खाऊन नष्ठ करणारया या मित्र किडी ज्या आंतरपिकांवर आकर्षीत होतात त्या आंतरपिकाचे नियोजन केले पाहिजे.
 उदाहरणार्थ:
चवळीचे पान व फुल, झेंडुचे पान व फुल, देशी हरबरयाचे पान व फुल,तुळशीचे पान व मंजीरी, मक्क्याचा कंसावरील रेशमी तुरा, देशी उडदाचे फुल व पान, गाजरची पान, मुळयाचे पान व शेंगा, सोपची पान व फुलं , बाजरीचे कंसाची फुलं , तुरिची फुलं , मोहरीची पानं  व फुलं , तसेच कारळाची फुलं  व पानं , मेथीची पानं  व फुलं , तसेच शेवग्याची पानं  व फुल.

 

 

मुख्य पानावर परत जाण्या साठी लिंक